Wednesday, November 24, 2021

हॅप्पीनेस मीटर 🙂🙁

राष्ट्राच्या यशात सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP). याचे आकडे हल्ली सतत आपण टीव्ही व  इतर माध्यमातून बघत असतो आणि मग कोणता देश किती प्रगत ते ठरवतो. 

पण या मोजमापामध्ये अजून एक एकक आहे ते म्हणजे GDH- Gross domestic Happiness. 2021च्या रिपोर्ट मध्ये 149 देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे 139, 2013 मध्ये तो होता 111. 
GDP च्या खूप गप्पा आपण ऐकत असतो पण happiness index बद्दल आपल्याला जास्त वाचायला किंवा ऐकायला का मिळत नसावं?



सकल राष्ट्रीय उत्पन्न, जीवनाअश्यक गोष्टींचा पुरवठा, आयुर्मान, निवड करण्याचे स्वातंत्र्य, औदार्य, भ्रष्टाचार या प्रमुख गोष्टीं Happines index साठी ग्राह्य धरल्या जातात. यामधील सकल राष्ट्रीय उत्पन्ना ची फक्त चर्चा होते ते पण अलीकडच्या काही वर्षांत.

सिंगापूर च सकल राष्ट्रीय उत्पन्न कोस्टारिका पेक्षा जास्त आहे पण gross domestic happiness मध्ये कोस्टरीका चा क्रमांक सिंगापूर च्या आधी येतो, म्हणजे कोस्टरीका चे नागरिक सिंगापूर मधल्या नागरिकांपेक्षा जास्त समाधानी आहेत? 
आज संपुर्ण जगात तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगती चालू आहे. Airtificial intelligence, flying cars, robots, space travel, biotechnology आणि इतरही अनेक क्षेत्रात पण तरीही आताचे आत्महत्येचे प्रमाण हे 1985  सालापेक्षा जास्त आहे याबाबद्दल ही विचार गरजेचा.

युवाल हारारी ने त्यांचा पुस्तकात फार छान सांगितलंय याबद्दल 
सुखी होण्याच्या मर्यादेला दोन खांबाचा आधार आहे. एक मानसिक आणि दुसरा शारीरिक. मानसिक पातळीवर आनंद हा खऱ्या परिस्थितीपेक्षा अपेक्षांवर जास्त असतो. आपल्या अपेक्षा आणि आपला आनंद या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरातील जीवरसायनशास्त्र ठरवतं; आपली अर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती नव्हे.




फोटो सौजन्य : गुगल

Sunday, May 3, 2020

इस्टॉप

लॉकडाउनमध्ये सध्या लपाछपी हा आमच्या इथे लहान गँग चा प्रमुख खेळ झालाय. फार अडगळीत न जाता तिथेच मागेपुढे लपायच मग ज्याच्यावर राज्य असेल त्याने जरा शोधल्यासारखं करायचं 1-2 वेळा बघून न बघितल्यासारखं करून 3 ऱ्या वेळा इस्टॉप इस्टॉप ओरडत सगळ्यांनी एकत्र येऊन नाचायचं...असा तो सगळा कार्यक्रम.

सध्या असाच काहीसा एकमेकांना इस्टॉप म्हणायचा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळी वर देखील चालू आहे.

हा कोरोना इटली आणि स्पेन मध्ये जसा वेगाने पसरत होता त्याच दरम्यान चीन कडून अस म्हणण्यात आला कि कदाचित मिलिटरी गेम्स च्या दरम्यान अमेरिकन सैन्यामार्फत हा virus चीन मध्ये आला असू शकतो.

त्यावर अमेरिकेकडून याचा china virus असा उल्लेख सुरु झाला आणि याचा प्रसार हा wuhan येथील लॅब मधून झाला असल्याचा दावा अमेरिके कडून करण्यात येऊ लागला आणि त्याचे पुरावे असल्याचे देखील ट्रम्प यांचेकडे आहेत अस सांगण्यात येतंय

या दाव्या नंतर चीन कसा शांत बसेल त्याचा प्रतिकार म्हणून digital currency आणि बाकी देशांना युआन मध्ये व्यवहार करायला लावायचे प्रयत्न हे सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर चे वर्चस्व कमी करण्याची चीन ची मोर्चे बांधणी असावी

एकंदरीत सामान्य माणसापर्यंत virus चे खरे कारण पोहचणे वगैरे तर सोडाच पण यात सुद्धा हे देश स्वतःच्या फायद्याचे आरोप एकमेकांवर कसे करतात अशा आरोपांच्या फेऱ्या tv वर नुसते बघत बसण्याची वेळ आहे

आणि भविष्यात हि चीन, अमेरिकेची रस्सीखेच अशीच चालू राहणार यात शंका नाही आता आपण भारत म्हणून कोणाच्या बाजून पुढेे रस्सी ओढणार हाच काय तो बघायचा विषय.

Thursday, March 26, 2020

महामारी नंतरचे जग



संपूर्ण जगाला आता संकटाचा सामना करावा लागत आहे. आमच्या पिढीने बघितलेले हे सर्वात मोठे संकट.
पुढचे काही दिवस सरकार जे निर्णय घेईल ते कदाचित आपल्या आरोग्य व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला, जागतिक राजकारण आणि संस्कृतीला ला देखील वेगळा आकार देऊ शकेल.

सध्या जास्तीत जास्त लोकं घरून काम करत आहेत. शक्य त्या शाळा ही ऑनलाईन चालू आहेत. सामान्य काळात सरकार, शाळा अशा प्रयोगांना सहज तयार होत नाहीत आता कदाचित सगळं सुरळीत झाल्यावर ही असे प्रयोग केले जातील.

चिनी सरकार आता Facial recognition, वैद्यकीय स्थिति तपासून त्या व्यक्तीच्या हालचालींचा मागोवा घेत रुग्ण कोणच्या संपर्कात आला ते शोधून काढत आहे. अशाप्रकारे एखाद्या माणसाच्या आरोग्याची स्तिथी पासून तो कोणाला कधी भेटतो आणि काय विचार करतो या सगळ्याच रेकॉर्ड सरकार ठेऊ शकते.  भविष्यात याचा उपयोग माणसांवर देखरेख करून नियंत्रण मिळवण्यासाठी होऊ शकतो.

भारत:
भारताच्या बाबतीत पण आपण कसे सामोरे जातो हे फक्त COVID-19 चे नाही तर आपले ही आयुष्य आणि जगात असलेली भारताची प्रतिमा अजून सुधारू शकते.एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा लोकशाही असणारा देश अशा परिस्तिथी ला कसा सांभाळतो हे कदाचित संपुर्ण जग बघत असेल.

COVID-19 चे प्रसार थांबल्यानंतर सर्व देश यातून बाहेर पडल्यानंतर परत एकदा सगळ्यांना चीन कडे manufacturing साठी वळावे लागेल कारण चीन तेवढी क्षमता असणारा देश आहे. तेव्हा आपल्याकडे आता महामारी शी सामना करून आणि जगाला चीनचा पर्याय देण्याची हीच वेळ आहे.

या महामारी च्या लढाई नंतर निश्चितच वेळ येणार आहे ती आर्थिक लढाई ला तोंड देण्याची.

हे सगळ अवघड नक्की आहे पण भारताला Global leadership च्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी पण आताच आहे.

Sunday, January 5, 2020

इराण विरूद्ध अमेरिका (तेलराजकारण)



लाल झेंडा उभा करून युद्धाला तयार असल्याचा इशारा आज इराणने दिला. आखाती देशांतले हे प्रकार आणि राजकारण हे काही नवीन नाही त्यातही इराण, अमेरिकी तील संघर्षाने सध्या चांगलाच पेट घेतलाय.

३ जानेवारी रोजी इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला आणि तो केला इराणच्या revolutionary guards नी असे चित्र आहे. इराणच्या gaurds नी इराक मध्ये अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला या वाक्यात त्याचे कारण आणि राजकारण आहे.

स्वतंत्र छोटे शहर असावे तसा हा इराक मधील अमेरिकेच्या दूतावासाचा भाग. अशाठिकणी हल्ला केल्यावर अमेरिकेने सुध्दा प्रत्युत्तर देताना केलेल्या हल्यात इराण चा जनरल कासिम सुलेमानी मारला गेला. ही व्यक्ती आणि Revolutionary gaurds हे आसपासच्या देशात सतत कार्यरत असतात तसे ते सध्या इराक मधे होते.

अमेरिकेच्या फौजा, इराण चे gaurds या सगळ्या मंडळींचे इराक मध्ये एवढं काय काम? तर या दोघांनाही इराक वर आपलं वर्चस्व पाहिजे आणि त्यात इस्राईल मध्ये हल्ली सारख्या चाललेल्या निवडणुका. इस्राईल मध्ये नेतन्याहू सत्तेत येण्यासाठी ही ट्रम्प पुरेपूर जोर लावतायत.
इराण वरील हा हल्ला म्हणजे एका दगडात अमेरिकेने मारलेले हे दोन पक्षी.

इराण ने अमेरिकेशी केलेले अणुकरार रद्द केले, Uranium च्या साठ्याची मर्यादा ही पाळणार नाही ही आताची त्यात नवी बातमी. 
एकंदरीत Trade war च्या फटक्यातून जागतिक अर्थव्यवस्था सावरत असताना वर्ष्याच्या सुरुवातीला च पेटलेल आखतातलं (तेल) राजकारण आपल्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला परत धक्का देणार हे नक्की.

Saturday, December 21, 2019

अदृश्य शत्रू

पेट्रोल बॉम्ब ठेवणारे आणि पोलिसांवर दगडफेक करणारे हे विद्यार्थी आहेत तरी नक्की कोणत्या प्रकारातले? मुळात हे जाळपोळ करणारे कोणतेही शिक्षण घेणारे विद्यार्थी असू शकतात? आणि त्यात काही असलेच तरी त्यांच डोकं भडकावून त्यांना पाठवून दिलय हे कोणत्याही शहाण्या माणसाला समजेल.

टीव्ही अँकर प्रोटेस्ट मधल्या लोकांना CAB संदर्भात प्रश्न विचारतोय असा व्हिडिओ सुद्धा सध्या पसरत आहेत, त्यात कणभर हि कोणाला काही माहिती आहे अस दिसत नाही मग हि भेड-चाल कशासाठी आणि कोणासाठी? हजारो टायर जाळले जातायत, बस जाळल्या जातायत, पेट्रोल बॉम्ब वगैरे या सगळ्यांसाठीचा पैसा येतोय कुठून?

हिंदू मुस्लिम च्या नावाने सगळा देश पेटवून द्यायचा आणि देशात अस्थिरता करायची हा मुख्य उद्देश असणारे अदृश्य शत्रू देशात कार्यरत आहेत. ३७०, भीमा कोरेगाव व अजूनही बऱ्याच दंग्यात आपण urban naxals हा शब्द ऐकला हि असेल. परकीय संघटना भारतात अशा दंग्याना पैसे  पुरवण्याचा, घडवायच काम करतात. (मध्य पूर्वेतील देश सुध्दा परकीय शक्तींच्या फायद्यांसाठी जन्माला आले आणि आजही त्यांच्यासाठी जळतायत. ) अशाच शक्तींचा एक मार्ग बंद होईल, व्होटबँक याच विचारांमुळे ही जाळपोळ.

आणि हे लोक आपल्या आसपास, मीडिया मध्ये, राजकारणात किती खोलवर घुसलेले असतात याचा आपल्याला अंदाजही नसतो. हा परकीय हस्तक्षेप आजचा नाही ७०-८० च्या दशकात ही सोव्हिएत युनियन चे एजेंट भारतात होते तर काही भारतीयांवर सुद्धा हेरगिरीचा आरोप झाले.

हा अदृश्य शत्रू शोधा वगैरे म्हणणं नाही पण निदान तथ्यता नसणारे व्हिडिओ न शेअर करणे, मेसेजेस फॉरवर्ड न करणे ही तरी सोपी गोष्ट आपण करू शकतो, कारण सोशल मीडिया हेच सध्या लोकांना भडकवण्याचे परकीय शक्तींचे मुख्य साधन आहे.

Monday, December 16, 2019

नसते उद्योग

Elastic या सॉफ्टवेअर स्टार्ट-अप कंपनीने सप्टेंबर मध्ये अमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल केला कारण अमेझॉन ट्रेडमार्क चे उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक करत आहे, असे ने तक्रारीत म्हंटले आहे. मुख्य म्हणजे या Elastic कंपनीचे सॉफ्टवेअर टूल अमेझॉन ने कॉपी केले असा आरोप आहे.

खरं बघता अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, स्टॅंडर्ड ऑईल हे सगळे अमेरिका नावाच्या धाग्यात असणारे म्हणजे एकाच माळेतील मणी.


अमेरिकेच्या तेल व्यापारात, राजकारणात "रॉकफेलर" आणि त्यांच्या स्टॅंडर्ड ऑईल कंपनीचे नाव विशेष.१९१० च्या आसपास त्यांची संपत्ती होती २५० बिलियन डॉलर्स. संपूर्ण तेलाच्या बाजारपेठेवर रॉकफेलर यांचे नियंत्रण होते, परिस्तिथी अशी कि कोणत्याही नवीन कंपनीने येऊन तेलक्षेत्रात काम करणे म्हणजे महाकठीण. तेलाची वाहतूक, साठवणूक शेवटी विकायला दुकाने मिळेपर्यंत सर्व गोष्टीत रॉकफेलर यांचा हस्तक्षेप असायचा मग नाईलाजाने ती नवीन कंपनी बंद तरी पडायची किंवा ती स्टॅंडर्ड ऑईल च्या ताब्यात जायची.
नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात आलेल्या मायक्रोसॉफ्ट चा पण हाच प्रकार. १९८५ मध्ये अँपल नेच OS संदर्भात मायक्रोसॉफ्ट वर आरोप केले होते.

जी भीती रॉकफेलर च्या काळात नवीन कंपनीला असायची तीच भीती नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ची असायची आणि आता ती अमेझॉन च्या बाबतीत आहे. प्रश्न यासारखी कंपनी किती कमावते याचा नाही प्रश्न नवीन उभा राहू पाहणाऱ्या कंपनी चा व अमेझॉन सारख्यापुढे टिकण्याचा आहे. आपल्याही देशात मीठ ते गाडी आणि मोबाईल मधील सिमकार्ड ते गाडीत घालावे लागणारे तेल या सगळ्यांवर ठराविक लोकांचेच नियंत्रण आहे  मग देशातले 1-2 उद्योजगांभोवती देशाचा व्यापार आणि पर्यायाने राजकारण केंद्रित होते प्रश्न त्याचाही आहे.

"People are afraid that Amazon's ambitions are endless"
                - Matthew Prince
     Chief executive of Cloudflare

Sunday, November 10, 2019

सायबर हल्ला

रोज सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद घेणे, रोज तेच प्रश्न विचारणे व त्यांची तीच उत्तरे ऐकणे यापलिकडे भारतात सायबर सेक्युरिटी मध्ये काय प्रकार चालाय याबद्दल प्रसारमाध्यमांना काही सांगायची इच्छा नाही आणि लोकांना ही फार ऐकायची इच्छा नाही.( काही विशिष्ट चेहऱ्यांना व बातम्यांना तर टीव्ही वर बघायचा अगदी कंटाळा आलाय, असो विषयात परत जाऊयात)

सध्या सायबर हल्याच्या पाठोपाठ तीन घटना घडल्या,

१: तामिळनाडू मधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पा वर वर सायबर हल्ला झाल्याचं NPCL ने मान्य केलं. हा प्रकल्प रशिया आणि भारतामध्ये आहे. येथे रशिया ने डिझाईन केलेले २ Reactors आहेत, ज्यांची क्षमता 1000MW प्रत्येकी अशी आहे आणि दक्षिण पावर ग्रीड साठी ते महत्वाचे आहे. आता अशा ठिकाणावर सायबर हल्ला होतो, अल्फाबेट च्या व्हायरस स्कानिंग वेबसाईट ने KKNPP च्या प्रशासकीय नेटवर्क मधून मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचे सांगितले आहे. हे खरे असेल तर फारच गंभीर आहे.
हा हल्ला उत्तर कोरियाशी संलग्न एका गटाने केला असल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे, तो कोणी केला आणि समोर जरी उत्तर कोरिया वाटत असेल तरी पडद्यामागे कोण? या प्रश्नाचे आता तरी उत्तर नाही.

२: भारतीय पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्त्यांची whatsapp द्वारे केली गेलेली हेरगिरी. NSO group, इस्राईल फर्म ने जागतिक पातळीवर १४०० लोकांची हेरगिरी केली आणि त्यात काही भारतीय आहेत असे whatsApp कडून सांगण्यात आले.
भारतात झालेली निवडणूक आणि त्यानंतर चे ३७० हटाव याच काळातील हा प्रकार असावा की काय आणि परत असेल तर पडद्यामागे कोण? याचे उत्तर सामान्यांना मिळणे कठीण.

३: इस्रोने पण हे सांगितले की CERT-In कडून चांद्रयान- २ वेळी सायबर हल्याचा अलर्ट मिळाला होता. मुंबईतील एका सायबर सिक्युरिटी फर्म चे म्हणणे आहे की, इस्रो सह ५ सरकारी एजन्सी ना उत्तर कोरियन हॅकर्स कडून पाठवलेल्या मालवेअरसह इमेल्स चे पुरावे आहेत.

म्हणजे सामान्य लोक वापरत असणारे whatsApp असो किवा इस्रो चे चंद्रयान किंवा भारताचा अणु ऊर्जा प्रकल्प या सगळ्यात परकीय शक्तींचा सहभाग असतोच हे परत अधोरेखित होते. आता याची गंभीरता लोकांपर्यंत न पोहचवण्याच काम पण ठराविक घटक करत असतात आणि आपणही रोज सकाळी अंघोळ करून प्रसारमाध्यमांचा ठरलेला पाढा आणि संजय राऊत काय म्हणतात बघायला तयार असतो.