Sunday, May 3, 2020

इस्टॉप

लॉकडाउनमध्ये सध्या लपाछपी हा आमच्या इथे लहान गँग चा प्रमुख खेळ झालाय. फार अडगळीत न जाता तिथेच मागेपुढे लपायच मग ज्याच्यावर राज्य असेल त्याने जरा शोधल्यासारखं करायचं 1-2 वेळा बघून न बघितल्यासारखं करून 3 ऱ्या वेळा इस्टॉप इस्टॉप ओरडत सगळ्यांनी एकत्र येऊन नाचायचं...असा तो सगळा कार्यक्रम.

सध्या असाच काहीसा एकमेकांना इस्टॉप म्हणायचा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळी वर देखील चालू आहे.

हा कोरोना इटली आणि स्पेन मध्ये जसा वेगाने पसरत होता त्याच दरम्यान चीन कडून अस म्हणण्यात आला कि कदाचित मिलिटरी गेम्स च्या दरम्यान अमेरिकन सैन्यामार्फत हा virus चीन मध्ये आला असू शकतो.

त्यावर अमेरिकेकडून याचा china virus असा उल्लेख सुरु झाला आणि याचा प्रसार हा wuhan येथील लॅब मधून झाला असल्याचा दावा अमेरिके कडून करण्यात येऊ लागला आणि त्याचे पुरावे असल्याचे देखील ट्रम्प यांचेकडे आहेत अस सांगण्यात येतंय

या दाव्या नंतर चीन कसा शांत बसेल त्याचा प्रतिकार म्हणून digital currency आणि बाकी देशांना युआन मध्ये व्यवहार करायला लावायचे प्रयत्न हे सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर चे वर्चस्व कमी करण्याची चीन ची मोर्चे बांधणी असावी

एकंदरीत सामान्य माणसापर्यंत virus चे खरे कारण पोहचणे वगैरे तर सोडाच पण यात सुद्धा हे देश स्वतःच्या फायद्याचे आरोप एकमेकांवर कसे करतात अशा आरोपांच्या फेऱ्या tv वर नुसते बघत बसण्याची वेळ आहे

आणि भविष्यात हि चीन, अमेरिकेची रस्सीखेच अशीच चालू राहणार यात शंका नाही आता आपण भारत म्हणून कोणाच्या बाजून पुढेे रस्सी ओढणार हाच काय तो बघायचा विषय.

Thursday, March 26, 2020

महामारी नंतरचे जग



संपूर्ण जगाला आता संकटाचा सामना करावा लागत आहे. आमच्या पिढीने बघितलेले हे सर्वात मोठे संकट.
पुढचे काही दिवस सरकार जे निर्णय घेईल ते कदाचित आपल्या आरोग्य व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला, जागतिक राजकारण आणि संस्कृतीला ला देखील वेगळा आकार देऊ शकेल.

सध्या जास्तीत जास्त लोकं घरून काम करत आहेत. शक्य त्या शाळा ही ऑनलाईन चालू आहेत. सामान्य काळात सरकार, शाळा अशा प्रयोगांना सहज तयार होत नाहीत आता कदाचित सगळं सुरळीत झाल्यावर ही असे प्रयोग केले जातील.

चिनी सरकार आता Facial recognition, वैद्यकीय स्थिति तपासून त्या व्यक्तीच्या हालचालींचा मागोवा घेत रुग्ण कोणच्या संपर्कात आला ते शोधून काढत आहे. अशाप्रकारे एखाद्या माणसाच्या आरोग्याची स्तिथी पासून तो कोणाला कधी भेटतो आणि काय विचार करतो या सगळ्याच रेकॉर्ड सरकार ठेऊ शकते.  भविष्यात याचा उपयोग माणसांवर देखरेख करून नियंत्रण मिळवण्यासाठी होऊ शकतो.

भारत:
भारताच्या बाबतीत पण आपण कसे सामोरे जातो हे फक्त COVID-19 चे नाही तर आपले ही आयुष्य आणि जगात असलेली भारताची प्रतिमा अजून सुधारू शकते.एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा लोकशाही असणारा देश अशा परिस्तिथी ला कसा सांभाळतो हे कदाचित संपुर्ण जग बघत असेल.

COVID-19 चे प्रसार थांबल्यानंतर सर्व देश यातून बाहेर पडल्यानंतर परत एकदा सगळ्यांना चीन कडे manufacturing साठी वळावे लागेल कारण चीन तेवढी क्षमता असणारा देश आहे. तेव्हा आपल्याकडे आता महामारी शी सामना करून आणि जगाला चीनचा पर्याय देण्याची हीच वेळ आहे.

या महामारी च्या लढाई नंतर निश्चितच वेळ येणार आहे ती आर्थिक लढाई ला तोंड देण्याची.

हे सगळ अवघड नक्की आहे पण भारताला Global leadership च्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी पण आताच आहे.

Sunday, January 5, 2020

इराण विरूद्ध अमेरिका (तेलराजकारण)



लाल झेंडा उभा करून युद्धाला तयार असल्याचा इशारा आज इराणने दिला. आखाती देशांतले हे प्रकार आणि राजकारण हे काही नवीन नाही त्यातही इराण, अमेरिकी तील संघर्षाने सध्या चांगलाच पेट घेतलाय.

३ जानेवारी रोजी इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला आणि तो केला इराणच्या revolutionary guards नी असे चित्र आहे. इराणच्या gaurds नी इराक मध्ये अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला या वाक्यात त्याचे कारण आणि राजकारण आहे.

स्वतंत्र छोटे शहर असावे तसा हा इराक मधील अमेरिकेच्या दूतावासाचा भाग. अशाठिकणी हल्ला केल्यावर अमेरिकेने सुध्दा प्रत्युत्तर देताना केलेल्या हल्यात इराण चा जनरल कासिम सुलेमानी मारला गेला. ही व्यक्ती आणि Revolutionary gaurds हे आसपासच्या देशात सतत कार्यरत असतात तसे ते सध्या इराक मधे होते.

अमेरिकेच्या फौजा, इराण चे gaurds या सगळ्या मंडळींचे इराक मध्ये एवढं काय काम? तर या दोघांनाही इराक वर आपलं वर्चस्व पाहिजे आणि त्यात इस्राईल मध्ये हल्ली सारख्या चाललेल्या निवडणुका. इस्राईल मध्ये नेतन्याहू सत्तेत येण्यासाठी ही ट्रम्प पुरेपूर जोर लावतायत.
इराण वरील हा हल्ला म्हणजे एका दगडात अमेरिकेने मारलेले हे दोन पक्षी.

इराण ने अमेरिकेशी केलेले अणुकरार रद्द केले, Uranium च्या साठ्याची मर्यादा ही पाळणार नाही ही आताची त्यात नवी बातमी. 
एकंदरीत Trade war च्या फटक्यातून जागतिक अर्थव्यवस्था सावरत असताना वर्ष्याच्या सुरुवातीला च पेटलेल आखतातलं (तेल) राजकारण आपल्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला परत धक्का देणार हे नक्की.