Sunday, November 10, 2019

सायबर हल्ला

रोज सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद घेणे, रोज तेच प्रश्न विचारणे व त्यांची तीच उत्तरे ऐकणे यापलिकडे भारतात सायबर सेक्युरिटी मध्ये काय प्रकार चालाय याबद्दल प्रसारमाध्यमांना काही सांगायची इच्छा नाही आणि लोकांना ही फार ऐकायची इच्छा नाही.( काही विशिष्ट चेहऱ्यांना व बातम्यांना तर टीव्ही वर बघायचा अगदी कंटाळा आलाय, असो विषयात परत जाऊयात)

सध्या सायबर हल्याच्या पाठोपाठ तीन घटना घडल्या,

१: तामिळनाडू मधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पा वर वर सायबर हल्ला झाल्याचं NPCL ने मान्य केलं. हा प्रकल्प रशिया आणि भारतामध्ये आहे. येथे रशिया ने डिझाईन केलेले २ Reactors आहेत, ज्यांची क्षमता 1000MW प्रत्येकी अशी आहे आणि दक्षिण पावर ग्रीड साठी ते महत्वाचे आहे. आता अशा ठिकाणावर सायबर हल्ला होतो, अल्फाबेट च्या व्हायरस स्कानिंग वेबसाईट ने KKNPP च्या प्रशासकीय नेटवर्क मधून मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचे सांगितले आहे. हे खरे असेल तर फारच गंभीर आहे.
हा हल्ला उत्तर कोरियाशी संलग्न एका गटाने केला असल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे, तो कोणी केला आणि समोर जरी उत्तर कोरिया वाटत असेल तरी पडद्यामागे कोण? या प्रश्नाचे आता तरी उत्तर नाही.

२: भारतीय पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्त्यांची whatsapp द्वारे केली गेलेली हेरगिरी. NSO group, इस्राईल फर्म ने जागतिक पातळीवर १४०० लोकांची हेरगिरी केली आणि त्यात काही भारतीय आहेत असे whatsApp कडून सांगण्यात आले.
भारतात झालेली निवडणूक आणि त्यानंतर चे ३७० हटाव याच काळातील हा प्रकार असावा की काय आणि परत असेल तर पडद्यामागे कोण? याचे उत्तर सामान्यांना मिळणे कठीण.

३: इस्रोने पण हे सांगितले की CERT-In कडून चांद्रयान- २ वेळी सायबर हल्याचा अलर्ट मिळाला होता. मुंबईतील एका सायबर सिक्युरिटी फर्म चे म्हणणे आहे की, इस्रो सह ५ सरकारी एजन्सी ना उत्तर कोरियन हॅकर्स कडून पाठवलेल्या मालवेअरसह इमेल्स चे पुरावे आहेत.

म्हणजे सामान्य लोक वापरत असणारे whatsApp असो किवा इस्रो चे चंद्रयान किंवा भारताचा अणु ऊर्जा प्रकल्प या सगळ्यात परकीय शक्तींचा सहभाग असतोच हे परत अधोरेखित होते. आता याची गंभीरता लोकांपर्यंत न पोहचवण्याच काम पण ठराविक घटक करत असतात आणि आपणही रोज सकाळी अंघोळ करून प्रसारमाध्यमांचा ठरलेला पाढा आणि संजय राऊत काय म्हणतात बघायला तयार असतो.