Elastic या सॉफ्टवेअर स्टार्ट-अप कंपनीने सप्टेंबर मध्ये अमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल केला कारण अमेझॉन ट्रेडमार्क चे उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक करत आहे, असे ने तक्रारीत म्हंटले आहे. मुख्य म्हणजे या Elastic कंपनीचे सॉफ्टवेअर टूल अमेझॉन ने कॉपी केले असा आरोप आहे.
खरं बघता अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, स्टॅंडर्ड ऑईल हे सगळे अमेरिका नावाच्या धाग्यात असणारे म्हणजे एकाच माळेतील मणी.
अमेरिकेच्या तेल व्यापारात, राजकारणात "रॉकफेलर" आणि त्यांच्या स्टॅंडर्ड ऑईल कंपनीचे नाव विशेष.१९१० च्या आसपास त्यांची संपत्ती होती २५० बिलियन डॉलर्स. संपूर्ण तेलाच्या बाजारपेठेवर रॉकफेलर यांचे नियंत्रण होते, परिस्तिथी अशी कि कोणत्याही नवीन कंपनीने येऊन तेलक्षेत्रात काम करणे म्हणजे महाकठीण. तेलाची वाहतूक, साठवणूक शेवटी विकायला दुकाने मिळेपर्यंत सर्व गोष्टीत रॉकफेलर यांचा हस्तक्षेप असायचा मग नाईलाजाने ती नवीन कंपनी बंद तरी पडायची किंवा ती स्टॅंडर्ड ऑईल च्या ताब्यात जायची.
नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात आलेल्या मायक्रोसॉफ्ट चा पण हाच प्रकार. १९८५ मध्ये अँपल नेच OS संदर्भात मायक्रोसॉफ्ट वर आरोप केले होते.
नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात आलेल्या मायक्रोसॉफ्ट चा पण हाच प्रकार. १९८५ मध्ये अँपल नेच OS संदर्भात मायक्रोसॉफ्ट वर आरोप केले होते.
जी भीती रॉकफेलर च्या काळात नवीन कंपनीला असायची तीच भीती नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ची असायची आणि आता ती अमेझॉन च्या बाबतीत आहे. प्रश्न यासारखी कंपनी किती कमावते याचा नाही प्रश्न नवीन उभा राहू पाहणाऱ्या कंपनी चा व अमेझॉन सारख्यापुढे टिकण्याचा आहे. आपल्याही देशात मीठ ते गाडी आणि मोबाईल मधील सिमकार्ड ते गाडीत घालावे लागणारे तेल या सगळ्यांवर ठराविक लोकांचेच नियंत्रण आहे मग देशातले 1-2 उद्योजगांभोवती देशाचा व्यापार आणि पर्यायाने राजकारण केंद्रित होते प्रश्न त्याचाही आहे.
"People are afraid that Amazon's ambitions are endless"
- Matthew Prince
Chief executive of Cloudflare
No comments:
Post a Comment