पेट्रोल बॉम्ब ठेवणारे आणि पोलिसांवर दगडफेक करणारे हे विद्यार्थी आहेत तरी नक्की कोणत्या प्रकारातले? मुळात हे जाळपोळ करणारे कोणतेही शिक्षण घेणारे विद्यार्थी असू शकतात? आणि त्यात काही असलेच तरी त्यांच डोकं भडकावून त्यांना पाठवून दिलय हे कोणत्याही शहाण्या माणसाला समजेल.
टीव्ही अँकर प्रोटेस्ट मधल्या लोकांना CAB संदर्भात प्रश्न विचारतोय असा व्हिडिओ सुद्धा सध्या पसरत आहेत, त्यात कणभर हि कोणाला काही माहिती आहे अस दिसत नाही मग हि भेड-चाल कशासाठी आणि कोणासाठी? हजारो टायर जाळले जातायत, बस जाळल्या जातायत, पेट्रोल बॉम्ब वगैरे या सगळ्यांसाठीचा पैसा येतोय कुठून?
हिंदू मुस्लिम च्या नावाने सगळा देश पेटवून द्यायचा आणि देशात अस्थिरता करायची हा मुख्य उद्देश असणारे अदृश्य शत्रू देशात कार्यरत आहेत. ३७०, भीमा कोरेगाव व अजूनही बऱ्याच दंग्यात आपण urban naxals हा शब्द ऐकला हि असेल. परकीय संघटना भारतात अशा दंग्याना पैसे पुरवण्याचा, घडवायच काम करतात. (मध्य पूर्वेतील देश सुध्दा परकीय शक्तींच्या फायद्यांसाठी जन्माला आले आणि आजही त्यांच्यासाठी जळतायत. ) अशाच शक्तींचा एक मार्ग बंद होईल, व्होटबँक याच विचारांमुळे ही जाळपोळ.
आणि हे लोक आपल्या आसपास, मीडिया मध्ये, राजकारणात किती खोलवर घुसलेले असतात याचा आपल्याला अंदाजही नसतो. हा परकीय हस्तक्षेप आजचा नाही ७०-८० च्या दशकात ही सोव्हिएत युनियन चे एजेंट भारतात होते तर काही भारतीयांवर सुद्धा हेरगिरीचा आरोप झाले.
हा अदृश्य शत्रू शोधा वगैरे म्हणणं नाही पण निदान तथ्यता नसणारे व्हिडिओ न शेअर करणे, मेसेजेस फॉरवर्ड न करणे ही तरी सोपी गोष्ट आपण करू शकतो, कारण सोशल मीडिया हेच सध्या लोकांना भडकवण्याचे परकीय शक्तींचे मुख्य साधन आहे.