Saturday, December 21, 2019

अदृश्य शत्रू

पेट्रोल बॉम्ब ठेवणारे आणि पोलिसांवर दगडफेक करणारे हे विद्यार्थी आहेत तरी नक्की कोणत्या प्रकारातले? मुळात हे जाळपोळ करणारे कोणतेही शिक्षण घेणारे विद्यार्थी असू शकतात? आणि त्यात काही असलेच तरी त्यांच डोकं भडकावून त्यांना पाठवून दिलय हे कोणत्याही शहाण्या माणसाला समजेल.

टीव्ही अँकर प्रोटेस्ट मधल्या लोकांना CAB संदर्भात प्रश्न विचारतोय असा व्हिडिओ सुद्धा सध्या पसरत आहेत, त्यात कणभर हि कोणाला काही माहिती आहे अस दिसत नाही मग हि भेड-चाल कशासाठी आणि कोणासाठी? हजारो टायर जाळले जातायत, बस जाळल्या जातायत, पेट्रोल बॉम्ब वगैरे या सगळ्यांसाठीचा पैसा येतोय कुठून?

हिंदू मुस्लिम च्या नावाने सगळा देश पेटवून द्यायचा आणि देशात अस्थिरता करायची हा मुख्य उद्देश असणारे अदृश्य शत्रू देशात कार्यरत आहेत. ३७०, भीमा कोरेगाव व अजूनही बऱ्याच दंग्यात आपण urban naxals हा शब्द ऐकला हि असेल. परकीय संघटना भारतात अशा दंग्याना पैसे  पुरवण्याचा, घडवायच काम करतात. (मध्य पूर्वेतील देश सुध्दा परकीय शक्तींच्या फायद्यांसाठी जन्माला आले आणि आजही त्यांच्यासाठी जळतायत. ) अशाच शक्तींचा एक मार्ग बंद होईल, व्होटबँक याच विचारांमुळे ही जाळपोळ.

आणि हे लोक आपल्या आसपास, मीडिया मध्ये, राजकारणात किती खोलवर घुसलेले असतात याचा आपल्याला अंदाजही नसतो. हा परकीय हस्तक्षेप आजचा नाही ७०-८० च्या दशकात ही सोव्हिएत युनियन चे एजेंट भारतात होते तर काही भारतीयांवर सुद्धा हेरगिरीचा आरोप झाले.

हा अदृश्य शत्रू शोधा वगैरे म्हणणं नाही पण निदान तथ्यता नसणारे व्हिडिओ न शेअर करणे, मेसेजेस फॉरवर्ड न करणे ही तरी सोपी गोष्ट आपण करू शकतो, कारण सोशल मीडिया हेच सध्या लोकांना भडकवण्याचे परकीय शक्तींचे मुख्य साधन आहे.

Monday, December 16, 2019

नसते उद्योग

Elastic या सॉफ्टवेअर स्टार्ट-अप कंपनीने सप्टेंबर मध्ये अमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल केला कारण अमेझॉन ट्रेडमार्क चे उल्लंघन करून ग्राहकांची फसवणूक करत आहे, असे ने तक्रारीत म्हंटले आहे. मुख्य म्हणजे या Elastic कंपनीचे सॉफ्टवेअर टूल अमेझॉन ने कॉपी केले असा आरोप आहे.

खरं बघता अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, स्टॅंडर्ड ऑईल हे सगळे अमेरिका नावाच्या धाग्यात असणारे म्हणजे एकाच माळेतील मणी.


अमेरिकेच्या तेल व्यापारात, राजकारणात "रॉकफेलर" आणि त्यांच्या स्टॅंडर्ड ऑईल कंपनीचे नाव विशेष.१९१० च्या आसपास त्यांची संपत्ती होती २५० बिलियन डॉलर्स. संपूर्ण तेलाच्या बाजारपेठेवर रॉकफेलर यांचे नियंत्रण होते, परिस्तिथी अशी कि कोणत्याही नवीन कंपनीने येऊन तेलक्षेत्रात काम करणे म्हणजे महाकठीण. तेलाची वाहतूक, साठवणूक शेवटी विकायला दुकाने मिळेपर्यंत सर्व गोष्टीत रॉकफेलर यांचा हस्तक्षेप असायचा मग नाईलाजाने ती नवीन कंपनी बंद तरी पडायची किंवा ती स्टॅंडर्ड ऑईल च्या ताब्यात जायची.
नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात आलेल्या मायक्रोसॉफ्ट चा पण हाच प्रकार. १९८५ मध्ये अँपल नेच OS संदर्भात मायक्रोसॉफ्ट वर आरोप केले होते.

जी भीती रॉकफेलर च्या काळात नवीन कंपनीला असायची तीच भीती नंतर कॉम्प्युटर क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ची असायची आणि आता ती अमेझॉन च्या बाबतीत आहे. प्रश्न यासारखी कंपनी किती कमावते याचा नाही प्रश्न नवीन उभा राहू पाहणाऱ्या कंपनी चा व अमेझॉन सारख्यापुढे टिकण्याचा आहे. आपल्याही देशात मीठ ते गाडी आणि मोबाईल मधील सिमकार्ड ते गाडीत घालावे लागणारे तेल या सगळ्यांवर ठराविक लोकांचेच नियंत्रण आहे  मग देशातले 1-2 उद्योजगांभोवती देशाचा व्यापार आणि पर्यायाने राजकारण केंद्रित होते प्रश्न त्याचाही आहे.

"People are afraid that Amazon's ambitions are endless"
                - Matthew Prince
     Chief executive of Cloudflare

Sunday, November 10, 2019

सायबर हल्ला

रोज सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद घेणे, रोज तेच प्रश्न विचारणे व त्यांची तीच उत्तरे ऐकणे यापलिकडे भारतात सायबर सेक्युरिटी मध्ये काय प्रकार चालाय याबद्दल प्रसारमाध्यमांना काही सांगायची इच्छा नाही आणि लोकांना ही फार ऐकायची इच्छा नाही.( काही विशिष्ट चेहऱ्यांना व बातम्यांना तर टीव्ही वर बघायचा अगदी कंटाळा आलाय, असो विषयात परत जाऊयात)

सध्या सायबर हल्याच्या पाठोपाठ तीन घटना घडल्या,

१: तामिळनाडू मधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पा वर वर सायबर हल्ला झाल्याचं NPCL ने मान्य केलं. हा प्रकल्प रशिया आणि भारतामध्ये आहे. येथे रशिया ने डिझाईन केलेले २ Reactors आहेत, ज्यांची क्षमता 1000MW प्रत्येकी अशी आहे आणि दक्षिण पावर ग्रीड साठी ते महत्वाचे आहे. आता अशा ठिकाणावर सायबर हल्ला होतो, अल्फाबेट च्या व्हायरस स्कानिंग वेबसाईट ने KKNPP च्या प्रशासकीय नेटवर्क मधून मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेल्याचे सांगितले आहे. हे खरे असेल तर फारच गंभीर आहे.
हा हल्ला उत्तर कोरियाशी संलग्न एका गटाने केला असल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे, तो कोणी केला आणि समोर जरी उत्तर कोरिया वाटत असेल तरी पडद्यामागे कोण? या प्रश्नाचे आता तरी उत्तर नाही.

२: भारतीय पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्त्यांची whatsapp द्वारे केली गेलेली हेरगिरी. NSO group, इस्राईल फर्म ने जागतिक पातळीवर १४०० लोकांची हेरगिरी केली आणि त्यात काही भारतीय आहेत असे whatsApp कडून सांगण्यात आले.
भारतात झालेली निवडणूक आणि त्यानंतर चे ३७० हटाव याच काळातील हा प्रकार असावा की काय आणि परत असेल तर पडद्यामागे कोण? याचे उत्तर सामान्यांना मिळणे कठीण.

३: इस्रोने पण हे सांगितले की CERT-In कडून चांद्रयान- २ वेळी सायबर हल्याचा अलर्ट मिळाला होता. मुंबईतील एका सायबर सिक्युरिटी फर्म चे म्हणणे आहे की, इस्रो सह ५ सरकारी एजन्सी ना उत्तर कोरियन हॅकर्स कडून पाठवलेल्या मालवेअरसह इमेल्स चे पुरावे आहेत.

म्हणजे सामान्य लोक वापरत असणारे whatsApp असो किवा इस्रो चे चंद्रयान किंवा भारताचा अणु ऊर्जा प्रकल्प या सगळ्यात परकीय शक्तींचा सहभाग असतोच हे परत अधोरेखित होते. आता याची गंभीरता लोकांपर्यंत न पोहचवण्याच काम पण ठराविक घटक करत असतात आणि आपणही रोज सकाळी अंघोळ करून प्रसारमाध्यमांचा ठरलेला पाढा आणि संजय राऊत काय म्हणतात बघायला तयार असतो.

Thursday, October 17, 2019

जिनपिंग आणि महाबलीपुरम

भारतीय पंतप्रधान मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्यासाठी महाबलीपुरमची निवड का केली?

महाबलीपुरम हे एक अत्यंत प्राचीन स्थळ आहे आणि या भागातील या 2 मोठ्या शक्तींच्या बैठकीत मोठी आवड निर्माण झाली आहे. ते येथे का भेटत आहेत? 2000 वर्षांहून अधिक काळ भारत आणि चीन यांच्यातील इतिहासामुळे. महाबलीपुरमच्या सभोवतालच्या या भागात पल्लव नावाच्या राजवंशाचा राजा होता, आता त्यांच्या तिरुपरमेश्वर विन्नगरम नावाच्या या प्राचीन मंदिराकडे पाहुया.

येथे भिंती हजारो हिंदू देवतांनी आणि मानवांनी सुशोभित केल्या आहेत, परंतु येथे आपल्याला काहीतरी विचित्र वाटेल. एक चीनी आकृती, तो एक महत्वाचा व्यक्तिमत्त्व असणे आवश्यक आहे, कारण ही एक मोठी आकाराची कोरीव काम आहे आणि बर्‍याच मदतनीसांनी ती बनविली आहे. तो बसलेल्या स्थितीत आहे आणि त्याच्या मिशा खाली एक बारीक, अरुंद दाढी दाखवत आहेत - ही चीनी वैशिष्ट्य दर्शविणारी उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. तो कोण आहे? आणि या प्राचीन मंदिरात तो का कोरला गेला आहे?

हा फॅक्सियन नावाचा एक चीनी प्रवासी आहे ज्याला भारतात फॅ-हिएन म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी सुमारे 400 एडी भारतात भेट दिली, होय ती 1600 वर्षांपूर्वीची आहे. आणि याच भागातील महाबलीपुरममधील हे ऐतिहासिक नक्षीकाम आहे आणि हे मंदिर त्याच पल्लव घराण्याचे आहे. भारतीय नेते आणि चीनी नेते ज्या ठिकाणी आता भेटले आहेत ते या मंदिरापासून 40 मैलांच्या अंतरावर आहे. आणि फॅक्सियन एकटेच नव्हते, कारण आपल्याला त्याच मंदिरात कोरलेल्या चिनी लोकांच्या कोरीव कामांचे दर्शन घडते. येथे एक पातळ चिनी आकृती आहे. त्याला लांब दाढी आणि मिशा आहे आणि तो एक चायनीज छत्री घेऊन जातो. चीनी प्रवाश्यांचा हा एक स्पष्ट ट्रेडमार्क आहे. तो एका बड्या हिंदु देवाकडे बोट दाखवताना दाखविला आहे. अर्थात हे एक रहस्य आहे ज्याचे निराकरण करणे आवश्यक आहे.
परंतु, महाबलीपुरममध्ये दोन्ही नेते विशेषत: एकत्र येण्याचे एक कारण असले पाहिजे. कारण हे आहे. महाबलीपुरम परिसराला बोधिधर्मांचे जन्मस्थान मानले जाते. बोधिधर्म हे पल्लव राजपुत्र होते ज्यांनी आपले शाही जीवन सोडून दिले आणि चीनमध्येही गेले, त्यांना शाओलिन कुंग फूचे संस्थापक मानले जाते आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर त्याची पूजा केली जाणारा एक महान तत्वज्ञ म्हणून त्यांचा आदर केला जातो.

मग, प्रथम प्रवास कोणी केला? भारतीय सर्वप्रथम चीनला गेले होते का? किंवा त्यांच्या आधी चिनी भारतात आले होते? असे दिसते आहे की भारतीय बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी प्रथम चीनमध्ये गेले, बौद्ध धर्माचा जन्म भारतात झाला आणि नंतर हळूहळू बर्‍याच आशियाई देशांमध्ये त्याचा प्रसार झाला. वस्तुतः बौद्ध धर्म आता भारतापेक्षा चीनमध्ये अधिक लोकप्रिय आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी २००० वर्षांपूर्वीदेखील भारतातील बौद्ध धर्मप्रचारक चीनमध्ये गेले होते.

Sunday, October 13, 2019

सीरिया?

सीरिया?

परिस्थिती गंभीर आहे. तुर्कीने कुर्दिश-नेतृत्वाखालील सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसविरूद्ध आक्रमण सुरू केले आहे, जे इस्लामिक स्टेटविरूद्ध सिरियामधील प्राथमिक अमेरिकन सहयोगी होते आणि उत्तर सीरियावर नियंत्रण ठेवतात. तुर्की आपल्या सीमेवर अलगाववादी कुर्दांशी लढा देत आहे आणि सिरियन कुर्दांना दहशतवादी मानतो.
कुर्दांसह अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीने नाजूक शांतता राखण्यास मदत केली. परंतु ट्रम्प यांनी तुर्कीला हे सांगितले की ते सीरियामध्ये मोहीम सुरू करू शकेल आणि अमेरिकेने सीमेवरील एका प्रदेशातून आपले सैन्य मागे खेचू शकेल असे सांगितल्यानंतर, तुर्की आणि अरब सीरियन सैन्याने बर्‍याच कुर्दांना ठार मारले आहे. अमेरिकेने घोषित केले की ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला उत्तर सीरियाबाहेर घालवून देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, रशियाच्या पाठिंब्याने सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद हे देशाच्या दक्षिणेकडील भागांवर नियंत्रण ठेवतात आणि हे सर्व पुन्हा घेण्यास इच्छुक आहेत.
आता ट्रम्प ची सैन्य मागे घेण्याची धडपड आणि रशिया ..हा विचार करण्याचा मुद्दा.